नवी मुंबई – मुंबई मार्गे चेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या  मोनोपोलो विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने ठेवले आहे. मुंबईतून बेट प्रवासासाठी मे २०१८ मध्ये ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिल्या टप्यात ठाणे- बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग (जोड) क्रमांक ४३.४३ किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्णवरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता बनविण्याचे नियोजन करण्यात आले. करोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबर सिडको, वनविभाग आणि सीआरझेडची परवानगी, रेल्वे ट्रॅकवर गर्डरसाठी परवानगी, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ठिकाणी महावितरणच्या केबल वाहक विद्याुत वाहिन्या जुनाट आणि कमी उंची असल्याने अडसर निर्माण झाला होता. भविष्यात अवजड उंच वाहनांची वर्दळ सुरु झाल्यास होणारा त्रास आणि गर्डर टाकण्याकरीता उन्नत मार्गातील ऐरोली सेक्टर-३ पोस्ट कार्यालयाजवळ पालिकेच्या उद्यानातून गेलेल्या विद्याुत वाहिन्या काढून चार ठिकाणी नव्याने मोनोपोल विद्याुत टॉवर उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १६ पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. तर १५ दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल करुन मोनोपोल टॉवर उभारला आहे. त्यामुळे आता ऐरोली रेल्वे स्थानकानजीक गर्डर टाकल्यानंतर उन्नत मार्गातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे, अशी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of airoli katai elevated roads is being done through mmrda amy