पनवेल : नवीन पनवेल येथील कोंबडी विक्रेत्याला पनवेल पालिकेच्या धूर फवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगाराने मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात कोंबडी विक्रेत्याच्या तक्रारीनंतर पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५( २), ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रमोद बनकर असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.
नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये संजय परमार यांच्या कोंबडी विक्रीच्या दुकानात ३२ वर्षीय अन्वर शेखर हे काम करतात. रविवारी दुपारी एक वाजता अन्वर हे दुकानात असताना कचरा घेऊन जाणारी घंटागाडी तेथे आली. अन्वर यांनी दुकानातील कचरा घंटागाडीत टाकताना त्याच ठिकाणी धूर फवारणी करणारा प्रमोद बनकर हा काम करत होता. अन्वरने कोंबडीची गाडी रस्त्यालगत उभी केल्याने कोंबड्यांची गाडी पुढे घेण्यावरुन भांडणे झाली. या भांडणात अन्वरला प्रमोदने सुरुवातीला शिविगाळ व मारहाण केली. मारहाणीनंतर कोंबडी दुकानाचे मालक संजय परमार यांना अन्वरने घडलेला प्रकार सांगितल्याने पुन्हा प्रमोदने अन्वरला मारहाण केल्याचे अन्वरने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पालिकेचे स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता प्रमोद हा पालिकेचा कंत्राटी कामगार असला तरी तोही पंचशीलनगर याच परिसरात राहणारा असून अन्वर शेख आणि प्रमोद यांच्या वैयक्तिक वादावरुन ही घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेचा आणि पालिकेच्या कारभाराचा काही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
या घटनेमुळे पालिकेतील स्वच्छता विभागातील सफाई, घंटागाडी आणि धूर फवारणीसाठी नेमलेल्या कंत्राटी कामगारांच्या अरेरावीच्या कारभाराविषयी चर्चा शहरभर सुरू आहे. घंटागाड्या शहरातील भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांसमोर कारण नसताना का उभ्या केल्या जातात. पालिका क्षेत्रात कचऱ्यातून जमा होणारे लोखंडी भंगार मागील आठ वर्षात कंत्राटी कामगारांनी किती जमा केले. जमा झालेले भंगार पालिकेने कुठे ठेवले याविषयी पुन्हा आढावा घेण्याची वेळ पालिकेवर आली आहे.