नवी मुंबई: तात्रिक फेरफार करीत वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने वीजचोरी विरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहेत. मागील एप्रिल -२०२२ ते जानेवारी- २०२३ पर्यंत नेरुळ विभागामध्ये वीजचोरीची एकुण ९० अशी एकुण ३९५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमधून महावितरणने एकूण २.३१ कोटी रुपयांची वसुली केलेली आहे व १९ वीज चोराविरुद्ध प्रकरणी एफआईआर दाखल केलेला आहे. जानेवारी अखेरपर्यंत तब्बल १३००० ग्राहकांची तपासणी करण्यात आली.
वीजचोरी मोहीम ही नेरुळ विभागामध्ये कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जाते. यामध्ये उपविभागीय अधिकारी व सर्व अभियंते जनमित्र, लाईनस्टाफ व सुरक्षा रक्षक सुद्धा सामील होतात. विशेष म्हणजे विभागामध्ये असलेल्या ९ महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असतात. वरील यशामध्ये या महिला अभियंत्याचा मोलाचा वाटा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा