माजी नगरसेवक एमके मढवी यांना आज दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आज पासून दोन वर्षांच्या पर्यत त्यांना मुंबई मुंबई उपनगरे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.रबाळे पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुंड मनोहर कृष्णा मढवी यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या अनुषंगाने त्यांना हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव रबाळे पोलिसांनी सात जुलैला उपायुक्त कार्यालयात पाठवला होता.सदर अहवाला बाबत सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास टेळे यांच्या नेतुत्वाखाली करण्यात चौकशी आली. प्राथमिक चौकशी करुन मनोहर कृष्णा (एमके) मढवी यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभुमीवावत सर्व अभिलेख प्राप्त करुन प्रस्तावीत हद्दपार नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना बचावाची संधी हि देण्यात आली होती . या सर्व प्रकिया पार पाडल्यावर त्यांना हद्दपार आदेश देण्यात आले व आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ठाणे, रायगड, मुंबई आणि मुंबई उपनगरे या ठिकाणाहून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा