पनवेल : राज्यातील लेडीज बार संस्कृती ज्या पनवेल मधील अतिरेकरा मुळे बंद झाली होती त्याच पनवेल मध्ये ही विकृत संस्कृती पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करुन गैरधंदे चालविल्याचे समोर आल्यास त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवर कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत, मात्र नवी मुंबई पनवेल मधील लेडीज सर्व्हीसबारमध्ये राजरोस गैरधंदे सूरु असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक शहराच्या सुसंस्कृतपणाला लेडीज सर्व्हीस बारसंस्कृतीचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. पहाटेपर्यंत सूरु असणा-या नवी मुंबई व पनवेलमधील लेडीज सर्व्हीसबारच्या तक्रारींचा पोलखोल नवी मुंबईच्या विशेष शाखेने दिवाळीत छापा टाकून केली आहे. आसूडगाव येथील इंटरनेट या लेडीज सर्व्हीसबारमध्ये पावणेदोन वाजता पोलीस पोहचल्यावर त्यांना २२ महिला वेटर आणि ७ पुरुष वेटर दिसून आले तर २० ग्राहक आढळून आले. पोलीसांच्या छापेसत्रात गेल्या अनेक वर्षात ४९ जणांवर कारवाई होण्याची ही मोठी घटना आहे. विशेष म्हणजे मंगळवारी (ता.२५) मध्यरात्री पावणेदोन वाजता दिवाळीची मौजमज्जा करण्यासाठी गेलेल्या २० गि-हाईकांना पहाटेपर्यंत पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. पोलीसांच्या छापेसत्रात २२ महिला वेटर या पुरुष ग्राहकासोबत अश्लिल व बिभस्त वर्तन करताना आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा