नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आवक वाढली आहे. तसेच बहुतांश कोथिंबीर खराब ही होत आहे. त्यामुळे घाऊक भाजीपाला बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरचे दर निम्म्यावर आले आहेत. मागील आठवड्यात १०-१४ रुपये जुडी उपलब्ध असलेली कोथिंबीर मंगळवारी कमीतकमी २-३ रुपये ते ५-६ रुपयांनी विक्री होत आहे.
एपीएमसी रात पुणे व नाशिकमधून कोथिंबीर दाखल होते. बाजारात मंगळवारी बाजारात २ लाख ४९ हजार ५००क्विंटल आवक झाली असून तेच मागील आठवड्यात दीड लाख क्विंटल आवक झाली होती.
हेही वाचा… शीव पनवेल महामार्गावर रोडपाली खाडीपुलावर हाईटगेज
सध्या बाजारात आवक वाढली असून खराब कोथिंबीर आवक अधिक आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबीरचे दर उतरले आहेत. तर ४०% खराब कोथिंबीर येत असून व्यापाऱ्यांना फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात १०-१४रुपये प्रतिजुडी उपलब्ध असलेली कोथिंबीर आता ५-६रुपये तर किरकोळ बाजारात १५ रुपयांनी विक्री होत आहे.