नवी मुंबई : मागील महिन्यात घाऊक तसेच किरकोळ बाजारात कोथिंबीर व इतर पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता पालेभाज्या दर आवाक्यात आले असून कोथिंबीर १५-३०रुपये जुडी तर मेथी १०-२५ रुपयांनी उपलब्ध आहे.सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे भाज्यांची उत्पादन खराब झाल्याने उत्पादन घटले होते.

मागणी जास्त पुरवठा कमी त्यामुळे दराने उच्चांक गाठला होता. घाऊक बाजारात कोथिंबीर ८०रुपये तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली होती . मागील महिन्यांत कोथिंबीर आवक ५०हजार ते १ लाख क्विंटल आवक झाली होती. आता दुप्पटीने आवक वाढली असून गुरुवारी बाजारात कोथिंबीर २ लाख ३६८०० क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे कोथिंबीर दर उतरले आहेत.

Story img Loader