नवी मुंबई: मंगळवारी नवी मुंबईतील उलवा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याविरोधात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. हे दाम्पत्य २०२१ मध्ये अवैधरित्या भारतात आले व तेव्हापासूनच उलवा येथे राहत होते. यातील महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.
इमरूल नूर मोहम्मद मुल्ला आणि लोसामी मुल्ला अशी यातील आरोपींची नावे आहेत. हे नवरा बायको असून मूळ पारंबो बाग तालुका कालिया जिल्हा नराईल, बांदलादेश येथे राहणारे आहेत. सोमवारी दुपारी आरोपींबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उलवा परिसरात त्यांचा शोध सुरु केला गेला.
आणखी वाचा-पाणवठे नष्ट व कोरडे झाल्याने उरणमध्ये येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची संख्या रोडावली?
त्यावेळी दोघेही सेक्टर १९ मधील शगुन इमारतीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुशंगाने सदर ठिकाणी जाऊन मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो मूळ बांदलादेशी असल्याची त्यांनी कबुली दिली. २०२१ मध्ये त्यांनी भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. तेव्हापासून ते उलवा परिसरात राहून बिगारीचे मिळेल ते काम करीत होता. मुल्ला हा परांची बांधण्याचे काम करतो तर त्याची पत्नी लोसामी ही नेरुळ परिसरात घरकाम करते. भारतात बेकायदा वास्तव्य दरम्यान त्यांना एक मुलगी झाली आहे. लोसामी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून तिचा शोध सुरु आहे.