नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांत असलेल्या स्मशानभूमींची पुरेशी देखभाल होत नसल्याची ओरड सुरू असतानाच नेरूळ येथील एका स्मशानभूमीला रातोरात करण्यात आलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या पार्थिवावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाल्यानंतर काही तासांत या स्मशानभूमीच्र्या भती, प्रवेशद्वार रंगवण्यात आले तसेच नामफलकही रंगवण्यात आला. या स्मशानभूमीची खराब अवस्था झाकण्यासाठीच ही तत्परता दाखवण्यात आल्याचे समजते. पालिकेने मात्र, या स्मशानभूमीत आधीपासूनच काम सुरू होते, असा दावा केला आहे. नेरूळ सेक्टर ४ येथील स्मशानभूमीच्या बाहेरीर्ल भतींना रंगरंगोटी तसेच आतील शौचालयाची दुरुस्तीची कामे गुरुवारी सायंकाळपासून वेगाने सुरू करण्यात आली.
हेही वाचा >>> पनवेल : खारघरमध्ये एकता धाव, सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजन
स्मशानभूमीमध्ये प्रवेश करताच जागोजागी पेव्हरब्लॉक तुटलेल्या अवस्थेत होते. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या ठिकाणी डागडुजीची कामे सुरू केली होती. मात्र या कामांचा वेग फारसा नसल्याच्या तक्रारी होत्या. नेरुळ येथील एका प्रभावी व्यक्तीचे निधन होताच त्यांच्या पार्थिवावर या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार करायचे ठरले. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय येणार हे नक्की होते. त्यात अनेक प्रतिष्ठित मंडळींचाही समावेश होता. त्यांच्यासमोर देखभालीकडे होणारे दुर्लक्ष उघडे पडू नये म्हणून स्मशानभूमीच्या कामांना अचानक वेग आला. येथील दहनभूमीची तात्काळ रंगरंगोटी करण्यात आली. बाहेरील पदपथ तसेच स्मशानभूमीच्र्या ंभतीची रंगरंगोटी करण्यात आली. २४ तासांत ही कामे उरकण्यासाठी ठेकेदाराला निर्देश देण्यात आले. त्यानंतर वेगाने ही कामे सुुरू करण्यात आली.