नवी मुंबई : नवी मुंबई सीवूड्स येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे. परंतु पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून प्रशासकीय संस्थांवर पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून चाणक्य तलावाजवळ नव्याने कांदळवनावर घाला घातला आहे. त्यात अनेक कांदळवने तोडून टाकण्यात आले आहेत.

सातत्याने या परिसरात कांदळवन्याला लक्ष केले जात असून कांदळवन वाचवण्यासाठी व पाणथळी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने आंदोलन करत असताना नुकतेच दि असोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर मुंबई यांनीही नवी मुंबईत नुकतेच आंदोलन केले आहे. तसेच यापुढे कांदळवन वाचवण्यासाठी सातत्याने आंदोलनात सहभागी होण्याचा पवित्रा व्यक्त केला आहे.

Yavatmal, Moneylender, kidnapped,
यवतमाळ : सावकाराचे अपहरण केले, खंडणीची रक्कम ठरली, हातात नोटांची पिशवी येणार एवढ्यात…
Nashik Dam Protest, Nashik, Administration Increases Water Discharge from Kashyapi Dam, nashik news,
काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई
separate road will be built for the construction of the vadhavan port
‘वाढवण’साठी स्वतंत्र पायाभूत सुविधा; पालघर जिल्ह्याचा आर्थिक स्तर तिपटीने वाढण्याचा दावा
Navi Mumbai, monsoon,
नवी मुंबई : पावसाळ्यात सतर्कतेचे निर्देश, आयुक्तांकडून महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व कामांचा आढावा
Nurses, Nurses Warn of Strong Protest Against New Working Hours, KEM hospital, Nair hospital, sion Hospitals, New Working Hours for nurse in bmc hospital, bmc, marathi news,
कामाच्या नव्या वेळेची जबरदस्ती केल्यास आंदोलन करू; नायर, केईएम, सायन रुग्णालयातील परिचारिकांचा प्रशासनाला इशारा
Smuggling, liquor, Goa, mango boxes,
आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त
nagpur, Swami Vivekananda s Statue, Ambazari Lake, Swami Vivekananda s Statue Near Ambazari Lake, Controversy Surrounds Swami Vivekananda s Statue in Nagpur, Flood Concerns, demand of removal of Swami Vivekananda,
पुतळ्याआडून कोणाचे हितरक्षण ? नागपुरात प्रशासनाच्या भूमिकेवर शंका
Gadchiroli, Recovery,
गडचिरोली : ‘यलो बेल्ट’साठी भूमाफियांच्या माध्यमातून लाखोंची वसुली? अर्चना पुट्टेवारच्या कार्यकाळातील घोटाळे…

हेही वाचा…उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम

नवी मुंबईतील एनआरआय संकुलाला लागून असलेला एक मोठा पट्टा राज्य शासनाने सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दिला आहे. त्यानंतर येथे एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे काम चालू झाले आहे. याच चाणक्य परिसरात वारंवार छुप्या पध्दतीने खारफुटी तोडून टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. तर दुसरीकडे पालिकेनेही या जमिनीवर टाकलेले पाणथळ आरक्षण हटवल्याने आधीच पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत संताप असतानाच सातत्याने खासगी विकासच्या माध्यमातूनच वारंवार छुप्या पद्धतीने खारफुटी तोडण्याचे प्रकार होत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी याच परिसरात दर रविवारी सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यात अंपायर्स असोसिएशनही सहभागी होत आहे. खारफुटी वाचवणे तसेच फ्लेमिंगोंचा अधिवास वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप आहे.

कांदळवन वाचवण्यासाठी आणि फ्लेमिंगोंचा अधिवास टिकवण्यासाठी अंपायर्स असोसिएसनकडून आंदोलन करण्यात आले. नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केलेच पाहिजे. पर्यावरणप्रेमींच्या मोहिमेमध्ये सातत्याने सहभाग घेऊन कांदळवन व फ्लेमिंगो अधिवास वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. – नविद भोंबल, सचिव, दि असोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर, मुंबई

हेही वाचा…एमएमआरडीएच्या अधिसूचनेवर ७ एप्रिलपर्यंत हरकती; उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांकडून हरकतींची नोंद

नवी मुंबई शहरातील कांदळवन अधिवास व फ्लेमिंगो वाचवण्यासाठी विविध संस्था पुढाकार व पाठिंबा देत असून मुंबईस्थित दि असोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर्स मुंबई यांचाही सहभाग मिळाला असून विविध संस्था सातत्याने आमच्या पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेला पाठबळ देत आहेत.– धर्मेश बराई, पर्यावरणप्रेमी व मँग्रोज सोल्जर