नवी मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृध्दांना लुबाडणा-या दोघांना गुन्हे शाखेने अटक केले आहे. त्यांच्या कडून ५ लाख ३० हजार रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबई, मुंबई व ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एकुण १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
नरेश विजयकुमार जयस्वाल, बाबु इराप्पा मणचेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिद्मध्ये काही अज्ञात आरोपी हे वयोवृध्द नागरीकांना अचानक रस्त्यात अडवून “पुढे नाकाबंदी चालु आहे तुमचे दागिणे व्यवस्थीत ठेवा.” तसेच ” तुम्ही मला ओळखले नाही का ? मी मोठा शेठ, दुकानदार आहे” असे सांगुन बतावणी करून बोलण्यात गुंतवूण हातचलाखीने त्यांचे कडील सोन्याचे दागिणे फसवूण चोरी केल्याचे प्रकार झाले होते.याबत अनेक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी अपात्र संचालकांना उच्च न्यायालयाचा दिलासा; चार संचालकांना दोन महिन्यांची मुदतवाढ
अशा गंभीर गुन्हयांची तात्काळ उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखा अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये,. गुन्हे शाखा उप आयुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी आदेशित केले होते.
गुन्ह्याचा तपास करीत असताना अशा प्रकारचे गुन्हयांमध्ये आरोपी हे वयोवृध्द नागरीकांना एकटे असताना हेरून करत असतात. वयोवृध्द नागरीकांकडे आरोपींबाबत विचारपुस करताना खुप मर्यादा येतात. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणने पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र पाटील, , नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नवी मुंबई, ठाणे, मुंबई तसेच मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. घडलेल्या गुन्हयांचे घटनास्थळी जावून फिर्यादी, साक्षीदार यांना भेटुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करून आरोपींची संभाषणाची भाषा, बोलण्याची पध्दत, पेहराव, शरीरयष्टी आदी माहिती घेतली. त्यानुसार अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय झाली असल्याचा निष्कर्ष तपास पथकाने काढला .
हेही वाचा >>> नवी मुंबई : नवीन लसणाने दरात घसरण, एपीएमसीत १० रुपयांनी बाजारभाव उतरले
या शिवाय सदर पथकाने गुन्हा घडल्याची वेळ, घटनास्थळी आरोपी येण्याजाण्याचा मार्गावरील सुमारे ६९ ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. गुन्हयांचा तांत्रिक तपास करून गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील व पथकाने अटक केली.
आरोपींना अटक करून आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात ५ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे हद्द गुन्हे उकल
कोपरखैरणे – ४, वाशी -२ नेरूळ , रबाळे,तुर्भे, माटुंगा , सायन , महात्मा फुले , कांजुरमार्ग प्रत्येकी एक असे एकूण तेरा गुन्हे उकल करण्यात यश आले आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, हवालदार प्रशांत काटकर, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार, अनिल पाटील, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्वर वाघ, इद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेऱ्या, पोलीस शिपाई संजय पाटील, विक्रांत माळी यांनी केली आहे.