Yashshree Shinde Murder : नवी मुंबईतल्या उरण या ठिकाणी यशश्री शिंदेची ( Yashshree Shinde ) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दाऊद शेखने २२ वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची हत्या केली. त्याआधी दाऊद शेखने तिच्यावर बलात्कार केला. हत्येनंतर यशश्रीची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचला. तसंच तिचे अवयवही कापले. यशश्री २५ जुलैपासून बेपत्ता झाली होती. रविवारी म्हणजेच २८ जुलैला तिचा मृतदेह उरण स्टेशनच्या बाहेर आढळून आला. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

नेमकी काय आहे ही घटना?

२२ वर्षीय यशश्री शिंदे ( Yashshree Shinde ) नावाची तरुणी २५ जुलैपासून बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवळ राहणाऱ्या यशश्रीचा ( Yashshree Shinde ) मृतदेह रविवारी कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. दाऊद शेखने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना केली. ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला.या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

हे पण वाचा- एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन फोटो समोर आले आहेत. त्यापैकी पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यशश्री शिंदे ( Yashshree Shinde ) हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर तिच्या मागे तब्बल १० मिनिटांनी दाऊद शेख जातो हे दिसून येतं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज २५ जुलै २०२४ या दिवशी दुपारी २ वाजून १४ मिनिट आणि ३५ सेकंदाचं आहे. यानंतर याच दिवशी आरोपी दाऊद शेख यशश्रीनंतर ( Yashshree Shinde ) साधारण आठ मिनिटांनी मिनिटांनी म्हणजेच, २ वाजून २२ मिनिटांनी तिच्या मागे जात आहे. पोलीस तपासात समोर आलेलं हे सीसीटीव्ही फुटेज त्याच दिवशीचं आहे, ज्या दिवशी यशश्रीची हत्या करण्यात आली.

Yashshree Shinde Murder News
यशश्री शिंदे या मुलीच्या हत्येआधीचं फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दाऊद तिच्या मागे गेला होता हे दिसतंं आहे.

दाऊद शेख विरोधात २०१९ मध्येही तक्रार

२५ जुलैपासून यशश्री बेपत्ता झाली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये यशश्री अल्पवयीन असतानाही दाऊद शेखच्या विरोधात यशश्रीच्या कुटुंबाने पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली होती. यशश्री १४ ते १५ वर्षांची होती तेव्हा दाऊद शेखला या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. त्याला दीर्घकाळ तुरुंगात रहावं लागलं होतं. या प्रकरणात आरोपी दाऊदला पोलिसांनी अटक केली. आता पुढील चौकशी सुरु आहे. मात्र शिंदे कुटुंबाने यशश्रीला ठार करणाऱ्या दाऊदला फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

यशश्री शिंदेच्या कुटुंबाने काय मागणी केली आहे?

“यशश्रीला दाऊद सातत्याने सतवत होता. ती वडिलांकडे तक्रार करायची, यशश्रीच्या वडिलांनी त्याला ताकीदही दिली होती. मात्र त्याने ऐकलं नाही. तो सातत्याने तिला मेसेज करायचा, तिला त्रास देत होता. त्याने तिला ज्या पद्धतीने मारलं ( Girl Murder ) त्यानंतर आमची एकच मागणी आहे की त्या दाऊदला लवकरात लवकर फाशी द्या.” यशश्रीचा भाऊ म्हणाला, “माझ्या बहिणीला जो त्रास झाला तसंच तिच्याबरोबर जे घडलं त्यानंतर आमची सरकारला ही विनंती आहे की दाऊदला फाशी झाली पाहिजे. इतर कुठल्या घरात असा प्रसंग होऊ नये यासाठी आम्ही हे आवाहन सरकारला करत आहोत” असं यशश्रीच्या भावाने म्हटलं आहे. “आरोपीवर लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे” असं यशश्रीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

Story img Loader