लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : सागरी जलाधिक्षेत्रात एलईडी आणि परप्रांतीय मासेमारीमुळे संकट ओढवले असून त्यामुळे मासळी कमी होऊ लागले आहे. यामध्ये परदेशी मच्छीमार बोटी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याच्या हद्दीत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतूनच दररोज लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे.

विद्युत जनसेटवर व एलईडी लाईट लाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत असल्याने वर्षभरात मासेमारी हंगामात मिळणारी मासळी एलईडीधारक पकडून पलायन करीत आहेत. याचा विपरीत परिणाम राज्यातील पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतशिल मासेमारी करणाऱ्या लाखो मच्छीमारांवर होत आहे. राज्यात जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदी असते. मात्र त्यानंतर ही मासळीची आधुनिक तंत्राचा वापर करून लूट केली जात आहे. याचा परिणाम स्थानिक आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायवर झाला आहे.

आणखी वाचा-उरणध्ये एका दिवसात कंटनेर धडकेत दोन बळी

एलईडी म्हणजे काय ती कशी केली जाते ?

एलईडी मासेमारी पद्धत म्हणजे मासेमारी बोटीवर विद्युत दिवे घेऊन जात ते समुद्रात पाण्याखाली पेटविण्यात येतात. या दिव्यांच्या प्रकाशावर मासळीचे थवेच्या थवे आकर्षित होतात. या माश्याना जाळी टाकून पकडले जातात. काही वेळातच मोठ्या प्रमाणात मासळी पकडली जाते. यामध्ये लहान मोठी मासळी पकडली जाते त्यानंतर छोटी मासळी पुन्हा समुद्रात फेकण्यात येते. मात्र यातील बहुतांशी मासळी मरून नुकसान होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crisis due to led and foreign overfishing in maritime jurisdictions mrj