उरणमधील चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या कडधान्य पिकांची मोकाट गुरे व माकडांकडून नासाडी सुरू असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना नगदी उत्पादन मिळवून देणारा रब्बी हंगामातील कडधान्य पिकांचा पारंपरिक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. परिणामी रब्बी हंगामात लाखो रुपयांचे उत्पादन मिळवून देणाऱ्या कडधान्य पिकांच्या शेतीची लागवड येथील बहुतांशी शेतकरी मोकाट गुरांच्या व जंगली वानरांच्या त्रासामुळे गेली कित्येक वर्ष करीत नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महापेकर त्रस्त, एमआयडीसी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले धारेवर

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

गुरांचा व माकडांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना व्हावी यासाठी उरण तहसील कार्यालय उपवनसंरक्षक रायगड अलिबाग व तालुका कृषी अधिकारी उरण यांच्याकडे चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाच्या वतीने गटाचे अध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील व अन्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लेखी तक्रारीचे निवेदन दिले आहे. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पिढ्यान पिढ्या चालत आलेला शेती व्यवसाय अजून शाबूत ठेवला असून २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाची निर्मिती करून आपल्या पारंपारिक शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून खरीप व रब्बी हंगामात जास्त उत्पादन देणारी वेगवेगळी पिके येथील शेतकरी घेत आहेत. परिणामी जेएनपीटी विस्थापित गावकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले पशुधन गाव सोडताना त्यांनी कर्नाळा अभयारण्य व चिरनेर रांनसई जंगल भागात सोडून दिल्यामुळे ही मोकाट गुरे खरीप हंगामात भात पिकांचे तर रब्बी हंगामात परिसरातील वाल, चवळी, हरभरा या कडधान्य पिकांचे नुकसान करीत आहेत. तर चिरनेर परिसर हा कर्नाळा अभयअरण्याला जोडून असल्यामुळे चिरनेर परिसरातील जंगल भागात कायमचाच मुक्काम ठोकून असलेल्या जंगली वानरांनी रब्बी हंगामातील कडधान्य पिकांबरोबरच चिरनेर परिसरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत लागवडीखाली आणलेल्या आंबा पिकांचे देखील या वानरांकडून नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या दिल्लीतील चित्ररथात ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’

आंबा पिकांना मोहर धरल्यापासून ते फळ काढणीपर्यंत आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असेही शेतकऱ्यांनी सांगितले. तर शेतावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांची देखील मोठ्या प्रमाणावर नासधूस या वानरांकडून होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी रानात जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी जात नाहीत. त्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. रानात ज्या ठिकाणी मोकळी माळराने होती त्या ठिकाणी आता झपाट्याने झाडांची वाढ झाली असल्यामुळे गुरांना चरण्यासाठी चाऱ्याची जागाच उरली नाही. परिणामी जेएनपीटी विस्थापित शेतकऱ्यांना गुरे सांभाळणे कठीण झाल्यामुळे या शेतकऱ्यांनी आपली गुरे जंगलात मोकाट सोडून दिली आहेत. हीच गुरे जिथे शेतात हिरवे दिसेल तिथे कंपाउंड तोडून अथवा कंपाउंड वरून उडी मारून शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहेत.