नवी मुंबई : जलद गती मार्गावर वाहन पार्क करणे नियमबाह्य असतानाही शीव पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी जड अवजड वाहने पार्क केली जातात. अशाच एका बेकायदा पार्क केलेल्या टेम्पोचा अंदाज न आल्याने टेम्पोला एक कार धडकली . या अपघातात मुंबईत कस्टम मध्ये अधीक्षक पदावर कार्यरत अधिकाऱ्याचा दुर्दवी मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.
घनशाम वर्मा असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी शीव पनवेल मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जुईनगर रेल्वे पादचारी पुलाखाली रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर वर्मा याने त्याचा टेम्पो ( एम एच ४६ बी.व्ही. ९२५१ ) पार्क केला होता. विशेष म्हणजे त्याने पार्किंग लाईट लावलेले नव्हते. सकाळी साडे अकरा बाराच्या सुमारास वाशी कडून सीबीडीच्या दिशेने याच मार्गावरून एका कार मधून कस्टम अधीक्षक नरेंद्र राय आणि त्यांचे सहकारी गौरव सिन्हा,अभिनव रामकुमार सिन्हा, आणि दीपक गुप्ता हे जात होते. जलद मार्ग असल्याने गाड्यांचा वेग बऱ्यापैकी जास्त होता. त्यात जुईनगर येथे उभा असलेल्या टेम्पोचा अंदाज टेम्पोचा पार्किंग लाईट सुरु नसल्याने गाडी चालवणारे अभिनव यांना आला नाही.
हेही वाचा…पनवेल: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्तांचे बदलीशस्त्र
त्यामुळे या टेम्पोला गाडी मागून धडकली. त्यात हे चौघेही जखमी झाले. मात्र नरेंद्र यांच्या डोळ्याला आणि डोक्याला जबर मार लागला. चौघांनाही अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे नरेंद्र यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तसेच अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.सदर अपघात घडल्यावर कार अचानक धडकल्याने मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी कारला धडकली. त्यात दुचाकीचे नुकसान झाले तर दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलगर्जी आणि बेकायदा गाडी पार्क केल्याने झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारण ठरला म्हणून टेम्पो चालक घनश्याम याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती तपासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम कोरडे यांनी दिली.