Gautami Patil Dance Program: सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलच्या नवी मुंबईतल्या कार्यक्रमात राडा झाला आहे. तरुणांनी गौतमीला बघण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड आणि राडा झाला आहे. ज्यानंतर पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली आहे. गौतमी पाटीलने अनेकदा हे सांगितलं आहे की माझ्या कार्यक्रमात राडा करायचा असेल तर येऊच नका. मात्र गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की त्यात राडा होणारच हे जणू काही समीकरणच झालं आहे. त्यामुळेच गौतमीला गणपती उत्सवात कोल्हापूरमधल्या दोन ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. नवी मुंबईत गौतमी पाटीलचा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात राडा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबईतल्या कामोठे भागात हा कार्यक्रम होता. गौतमी पाटील या कार्यक्रमात तिचं नृत्य सादर करत होती. तिला पाहण्यासाठी तरुणांची खूपच गर्दी झाली. खुर्च्यांची मोडतोडही सुरु झाली. ज्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवला तसंच कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेरही काढलं. मात्र तोपर्यंत काही उत्साही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोडही केली. कामोठे भागात गौतमी पाटील पहिल्यांदाच आली होती. तरीही तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळालं.

हे पण वाचा- नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळ आणि भांडणाविषयी काय म्हणाली होती गौतमी?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं, त्यावेळी गौतमी पाटील म्हणाली, “कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं. कार्यक्रम खूप छान पार पडला. भांडण किंवा मारामारी आजच्या कार्यक्रमात काहीही घडलं नाही. मला नियोजन खूपच आवडलं. माझा कार्यक्रम म्हटलं की गडबड आणि गोंधळ, मारामारी असं होतं असंच सांगितलं जातं. मात्र माझ्या सगळ्याच कार्यक्रमात भांडण, मारामारी असे काही प्रकार होत नाहीत. पण काय होतं त्यावरुनच टार्गेट केलं जातं. मात्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही. याआधी जी बातमी समोर आली होती तो माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे तसं घडलं. मात्र प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही.”

गौतमी पाटील लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘घुंगरू’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंतांची व्यथा मांडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची गौतमीचे चाहते वाट बघत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer gautami patil navi mumbai event chairs vandalized police take action scj