पनवेल: शीव-पनवेल महामार्गावर ५० वर्षांपुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला रोडपाली येथील खाडी पुल धोकादायक झाल्याने तो लवकरच पाडण्यात येणार आहे. नवा पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रीयेचे काम सुरु असून तोपर्यंत या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. हलकी वाहने या पुलावरुन महिनाभर जाऊ शकतील यासाठी शीव पनवेल महामार्गावरील या पुलावर हाईटगेज लावण्यात आले. मात्र हे लोखंडी हाईटगेज अवजड वाहनांनी ठोकरुन तोडून टाकले. त्यामुळे हा पुल सध्या सर्वच वाहनांसाठी बंद कऱण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७० साली रोडपाली खाडी पुल बांधण्यात आला होता. सध्या हा पुल जिर्ण अवस्थेत असल्याने या पुलाची गणती धोकादायक पुलाच्या यादीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेआठ मीटर रुंदीचा आणि ४१ मीटर लांबीचा हा पुल बांधण्याचे निश्चित केल्यानंतर त्या संदर्भात निविदा प्रक्रीया अंतिम टप्यात आहे. सूमारे २७ कोटी रुपये हा पुल बांधण्यासाठी खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. निविदा प्रक्रीया पुर्ण झाल्यावर वर्षभरात या पुलाचे काम पुर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.