नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम सुरू असून बोकडविरा ते द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत.असे असतानाही हे रूळ ओलांडून वाहनचालकांकडून धोकादायक प्रवास केला जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरण रेल्वे स्थानक ते गव्हाण दरम्यान रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्याची सुरुवात उरण मधून करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वी बोकडविरा ते उरणला जोडणारा ओएनजीसी असा रस्ता होता. त्यामुळे बोकडविरा रस्त्याला रेल्वेचे फाटक होते. मालगाडी आल्यानंतर हे फाटक बंद केले जात होते.
मात्र नव्याने सुरू होणाऱ्या उरण ते नेरूळ लोकलसाठी सिडकोने पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे. हा उड्डाणपूल रेल्वे पार न करता जवळचा मार्ग म्हणून अनेक दुचाकी स्वार व रिक्षा चालक धोकादायक रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करत आहेत. नव्याने याच मार्गावर नवीन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आले असतानाही या मार्गावरून प्रवास केला जात आहे.