पुनम सकपाळ
नवी मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर होणारे अपघात अनेक उपाय योजना करून देखील आटोक्यात येताना निदर्शनास येत नाही. करोना दरम्यान रेल्वे अपघात एकदम कमी झाले होते परंतु पुन्हा अपघातात वाढ होत आहे. नवी मुंबईतील ट्रान्स-हार्बरमार्गावर मागील वर्षी ही १२४ तर यंदाही १२३ जणांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे.मात्र यातही रेल्वे रूळ ओलांडताना अपघातात मृत पावलेल्यांची संख्या जास्त आहे.मागील वर्षी ९० तर यंदा ७२ जणांचा रूळ ओलांडताना अपघात झाला असून मृत्यू झाला आहे. विविध उपाययोजना करून देखील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे.
नवी मुंबईतील ट्रान्स-हार्बरमार्गावर रेल्वे स्थनाकालगत संरक्षक भिंती उभारण्यात आलेल्या आहेत, मात्र तरी देखील रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताची परिस्थिती जैसे थेच आहे. वाशी रेल्वे स्थानक हे नवी मुंबई शहराचे महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून नवी मुंबई मुंबई तसेच उपनगराना जोडली गेली आहे. वाशी रेल्वे पोलीस यांच्या अख्यारीत गोवंडी ते सीवूड तसेच वाशी ते रबाळे हा रेल्वे मार्ग आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२१ मध्ये १२४ तर सन २०२२ आतापर्यंत १२३ जण रेल्वे अपघातात मृत पावले आहेत. यामध्ये मागील वर्षी रूळ ओलांडून ९०जणांनी जीव गमावला आहे तर २३ जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे.तर ११जणांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तेच यंदा एकूण १२३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ७२ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून तर ३१लोकल मधून पडून तर २०नैसर्गिक मृत्यू झाले आहेत, अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली आहे.
प्रवाशांचा शॉर्टकट बेतोय जीवावर
रेल्वे रोड ओलांडून होणारे अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकालगत संरक्षण भिंती उभारून रेल्वे रूळ अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे मात्र तरी देखील आज मी तिला रेल्वे रूळ ओलांडून अपघाताची परिस्थिती जयतेच आहे. रेल्वे प्रवाशी रेल्वे पूल व सबवेचा वापर न करतालोकल पकडण्याच्या नादात शॉर्टकट रस्ता वापरतात. त्यामुळे एन घाईत रेल्वे रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने प्रवाशांचा रेल्वे अपघात होतो. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा प्रवाशांना प्रवासावेळी नियम पाळायचे आवाहन करत असते. परंतु, प्रवासी मात्र नियमांना पायदळी तुडवून प्रवास करतात. काही नागरिक मुद्दाम आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर उभे राहतात. त्यामुळे नागरिकांचा शॉर्टकट रस्ता बेज बद्दल पण नाही त्यांच्या जीवावर बघत बसून अपघात परिस्थिती कायम आहे.
मृत्यू संख्या सन २०२१ सन २०२२
रूळ ओलांडून मृत्यू ९० ७२
लोकलमधून पडून मृत्यू २३ ३१
नैसर्गिक मृत्यू ११ २०
एकूण १२४ १२३