पनवेल ः मागील दोन वर्षांपासून आगरी व कोळी समाज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे आंदोलन तीव्र झाले. मात्र महायुतीचे सरकार सत्तेत राज्य व केंद्र सरकार तातडीने नामकरणाचा निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक झाले आहेत. याबाबत सोमवारी बैठक होणार असून त्यात नामकरण आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील महिन्यात केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने नामकरणाबाबतचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती जाहीर केली. मात्र केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठविलेल्या नामकरणाच्या मसुद्यात काही त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्रुटी दूर करन नवीन मसुद्यात नामकरण प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा लागणार आहे. यामुळे नेमके राज्य सरकार दि. बा. पाटील यांच्या नावाप्रती गंभीर नाही का असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना सतावत आहे. याच विषयावर आंदोलन करुन राज्य व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी सोमवारी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने आयोजित केली आहे. ही बैठक पनवेल शहरातील आगरी समाज हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दथरथ पाटील यांनी दिली. या बैठकीत पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई : बोनकोडे गावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट
या बैठकीमध्ये विमानतळ नामकरण, एमआयडीसी व औद्योगिकरण, गावठाण विस्तार समितीच्या प्रश्नांसाठी पदाधिका-यांची निवड करणे, सिडको मंडळामधील प्रश्नांसाठी चर्चा करणे अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केंद्र सरकारने न केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे तरुण प्रकल्पग्रस्तांकडून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी कृती समितीने तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा अशी मागणी होत आहे. यापूर्वी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सुद्धा सरकारच्या वेळकाढू धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मागील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीमध्ये केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी केंद्राकडे नामकरणाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली.
मात्र या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याची माहिती समोर येत आहे. कृती समितीचे अध्यक्ष पाटील यांनी लोकसत्ताला माहिती देताना राज्य सरकारने केंद्र सरकारला इतर विमानतळाचे नाव ज्या मसुद्यात पाठविले त्याच मसुद्याप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव का पाठविले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कोकण भवन येथे आमरण उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगीतले. तसेच स्वता दशरथ पाटील हे धरणे आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगीतले. केंद्र सरकारने तातडीने पाऊले न उचलल्यास पुढील महिन्यात हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्तांचे हे आंदोलन उभे राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. याच आंदोलनाची पुढील दिशा सोमवारच्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ठरणार आहे. या समितीचे उपाध्यक्ष माजी खा. रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, माजी खा. संजीव नाईक, सल्लागार माजी खा. जगन्नाथ पाटील, सरचिटणीस भूषण पाटील, दीपक म्हात्रे, सहचिटणीस गुलाब वझे, संतोष केणे, सुरेश पाटील, राजेश गायकर, खजिनदार जे. डी. तांडेल, विनोद म्हात्रे हे पदाधिकारी व आ. मंदा म्हात्रे, आ. महेश बालदी, आ. गणपत गायकवाड, आ. राजू पाटील, माजी आ. सूभाष भोईर व इतर कार्यकारीणीमध्ये आहेत.