उरण : सार्वजनिक बांधकाम(पीडब्ल्यूडी) विभागाच्या दुर्लक्षामुळे दास्तान फाटा ते चिर्ले मार्ग खड्डयांमुळे चिखलमय बनला आहे. त्यामुळे या मार्गारून अवजड वाहनांची होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. जेएनपीए बंदरामुळे आयात – निर्यातीसाठी उरण तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत मोठमोठी अनधिकृत गोदामे,एमटी यार्ड उभारण्यात आली आहेत. या गोदामात ये जा करणारी अवजड कंटनेर वाहने ही प्रवासी वाहनांच्या रहदारीसाठी बनविण्यात आलेल्या मार्गावरून जात आहेत. रात्री अपरात्री चालणाऱ्या या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. येथील सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यात पावसाळ्यात अधिकची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या चिर्ले ते दास्तान फाटा या दरम्यान रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील नागरीक करीत आहेत. त्याचप्रमाणे शासनाने या मार्गाची दुरुस्ती करून रस्ता नव्याने बनवून मजबुतीकरण करावे व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करावा अशी मागणी चिर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.दास्तान फाटा ते चिर्ले रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र पावसामुळे येथील रहिवाशाच्या घरात पाणी जात असल्याने खड्ड्यातील पाणी उपसा करून येत्या रविवार पर्यत काम पूर्ण करून घेतले जाईल अशी माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.