पनवेल: नवीन पनवेल वसाहतीमध्ये सोमवारी दुपारी एका बंद मोटारीत मृतदेह आढळला. नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत खांदेश्वर पोलीस तपास करत आहेत. प्रशांत वर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून प्रशांत हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. वर्मा हे कुटूंबियांसोबत सेक्टर १६ येथे राहत होते. सोमवारी दुपारी सेक्टर १७ येथील रस्त्यावर मारुती स्वीफ्ट मोटारीत (एमएच ०१ एई ७४९२) प्रशांत यांचा मृतदेह पाहील्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ माजली. प्रशांत यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच प्रशांत यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते समजणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक वैशाली गलांडे यांनी दिली.
नवीन पनवेलमध्ये मोटारीत मृतदेह
प्रशांत वर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून प्रशांत हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-06-2023 at 20:58 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead body found in car at sector 17 of new panvel colony zws