पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात भाज्यांची आवक घटते. त्याचबरोबर आता पाऊस लांबल्याने ही भाज्या वधारल्या आहेत. भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

एपीएमसी बाजारात नित्याने ५५०ते ६०० गाड्या आवक होते. मंगळवारी बाजारात ५३९ गाड्या दाखल झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये टोमॅटो अधिक स्वस्त होते, परंतू आता टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून टोमॅटोच्या दरात प्रतकिलो १२-१८ रुपयांनी दरवाढ झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोचे दर गडगडले होते, त्यामुळे कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एपीएमसीत टोमॅटो आवक घटली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबईत गढूळ पाण्यावरुन संताप , पालिकेने नागरिकांना पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर वाटावेत

मंगळवारी बाजारात २८८७ क्विंटल आवक झाली असून प्रतिकिलो २० ते ३२रुपयांनी उपलब्ध असून किरकोळ बाजारात ५०ते ६०रुपयांनी विक्री होत आहे. घाऊकमध्ये प्रतिकिलो गवार, भेंडी ,हिरवी मिरची ,शिमला मिरची, ४०-४५ रू, फ्लॉवर ११-१२रु, वांगी ३०-३२रु, अद्रक १८०रू, कोथिंबीर १५-२०रुपये जुडी तर मेथी १०-१५रू जुडी दराने विक्री होत आहे. पाऊस लांबल्याने उत्पादन कमी झाले आहे , त्यामुळे भाज्यांची दरवाढ होत आहे असे मत व्यापारी संजय फुलसुंदर यांनी व्यक्त केले आहे.