मंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात १७ नोव्हेंबरला मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला होता . ही आग येथील केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच कोणतेही अग्निशामक यंत्रणा नसल्याने पसरल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने पाच ही बाजारातील अधिकाऱ्यांची एक विशेष समिती गठीत केली होती. ही समिती या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारांची पाहणी करून अहवाल सादर करणार होती. परंतु आता एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही अहवाल सादर करण्यास विलंब का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नवी मुंबई : अवजड वाहतूक डोकेदुखी ठरत असल्याने पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

एपीएमसी फळ बाजाराततील आग शॉट सर्किट तसेच येथील ढिगभर असलेले पुठ्ठे आणि अतिक्रमणामुळे अधिक पसरली होती. यात २० ते २५ गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. येथील कागद पुठ्ठे,लाकडी खोके व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ही आग अधिकच भडकल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. परंतु एपीएमसी बाजारात अग्निशामक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने अशा आगीच्या घटना घडल्यास मोठ्या दुर्घटना होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाने एक विषय समिती गठीत केली होती . या समितीने दोन आठवड्यातच पाचही बाजाराची पाहणी करून काही मुद्दे निदर्शनास आणले आहेत. यामध्ये वाढीव जागेचा गैरवापर, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण अग्निशामक यंत्रणा नसणे, पार्किंगची व्यवस्था नसणे इत्यादी बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये गाळा निहाय अग्निशामक यंत्रणा सक्तीचे करण्याचा तसेच अतिक्रमणाचा विषय समोर आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: तुर्भेतून २ टनांहून अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

एपीएमसी बाजार समिती विशेषतः भाजीपाला आणि फळबाजारात मोठ्या प्रमाणावर बहुतांशी व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम करून एकावर एक इमले रचून वरती कार्यालय सुरू केली आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजार समितीकडून व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का ? हे या अहवालातून स्पष्ट होईल. ही समिती १५ दिवसात अहवाल सादर करणार होती . परंतु एक महिना उलटूनही अद्याप अहवाल सादर न केल्याने अहवालास दिरंगाई का? होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.