मच्छीमारांसाठी बोटी दुरुस्तीसाठी करंजा बंदरात उभारण्यात येत असलेले साडे नऊ कोटी खर्चाचे ड्रायडॉक आठ वर्षांपासून अपुर्ण अवस्थेत पडून असून ड्राय डॉकच नसल्याने नौका दुरुस्तीच्या कामासाठी येथील शेकडो मच्छीमारांची गैरसोय होत आहे. दहा वर्षापूर्वी १००० बोटी क्षमतेच्या मच्छीमार बोटीं लॅण्डींग करण्यासाठी अद्यावत करंजा मच्छीमार बंदराची उभारण्यात येत आहे.या मच्छीमार बंदराची उभारणी करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी पुर्वापार वापर करत असलेल्या जागेवर करण्यात आली आहे.
त्यामुळे करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी जागा उरली नव्हती. त्यामुळे करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून करंजा-नवापाडा येथील मच्छीमारांसाठी बोटी दुरुस्तीसाठी १५० कोटी खर्चाच्या उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या शेजारीच २५० मीटर लांबीचा व २०० मीटर रुंदीचा अशी ५०००० चौमी जागा ड्रायडॉकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : पोलिसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनाला सुरुवात
मच्छीमार बोटींच्या दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागे सभोवार संरक्षक भिंत उभारणी आणि जागा सरफेस, कॉक्रीटीकरण करण्याच्या कामांसाठी ८ वर्षांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुमारे साडेनऊ कोटी निधीही मंजुर केला आहे. मात्र मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ड्रायडॉकचे काम अद्यापही पुर्णत्वास गेलेले नाही. सध्या मासेमारी हंगाम जोरात सुरू झाला असून मच्छीमारांना जाळी सुकवणे ,यावेळी बोटीची दुरुस्ती करणे अशी कामे सुरू असतात ड्रायडॉकच्या अपुऱ्या कामामुळे मच्छीमारांना बोटी दुरुस्तीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नांत ट्रक चालक जखमी
या कामात मत्स्यव्यवसाय विभागाकडून दुर्लक्षच होत असल्याने मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुर्ण अवस्थेत असलेल्या ड्रायडॉकच्या कामामुळे मच्छीमार बोटींच्या दुरुस्ती, रंगरंगोटीच्या कामांसाठी मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आठ वर्षांऩंतरही रखडत रखडत चाललेले काम पुर्ण करण्यासाठी संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे मत करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी व्यक्त केले आहे.