सीवूड्स सेक्टर ४८ येथे पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोरच असलेल्या भूखंड क्रमांक २९ येथे मागील ३ वर्षापासून बेकायदा सुरु असलेल्या आश्रमशाळेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने व सिडकोने संयुक्तरित्या कारवाई केली. परंतू भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त, सिडको यांच्याकडे तक्रार केल्यानंतरच सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चवर तोडक कारवाई करण्यात आली. परंतू नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्यासमोर बेकायदा बांधकाम करुन चर्च उभारण्याकडे नवी मुंबई व सिडको या सरकारी आस्थापनांनीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शहरात बेलापूर ते दिघा पर्यंत सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारीच व त्यांचा अतिक्रमण विभागच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील बेकायदा बांधकामाचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा