उरणमधील वायू विद्युत केंद्रात रविवारी झालेल्या स्फोटात बोकडविरा येथील विष्णू पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते कंत्राटी कामगार असल्याने त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन म्हणून त्यांच्या पत्नीला केंद्रात कायमस्वरूपी नोकरी व ५० लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचा प्रस्ताव सोमवारी केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी महाजनकोच्या संचालकांना पाठविला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा- उरणच्या वायू विद्युत केंद्र स्फोटातील आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
उरणच्या वायू विद्युत केंद्रात वेस्ट हिट
रिकव्हरी विभागात स्फोट होऊन तीन कर्मचारी होरपळले होते. त्यातील अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील जखमी तंत्रज्ञ कुंदन पाटील यांच्या उपचार सुरू आहेत.त्यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनेतील कामगारांच्या मृत्यू नंतर प्रकल्पा शेजारील बोकडविरा,डोंगरी,फुंडे व भेंडखळ या चार गावातील ग्रामस्थांनी दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी व नुकसानभरपाई च्या मागणीसाठी सोमवारी आंदोलन सुरू केले होते. यावेळी व्यवस्थापना सोबत झालेल्या चर्चेच्या फेरीत तोडगा निघत नसल्याने रात्री ९ वाजताच्या सुमारास मृत कामगाराचा मृतदेह वायू विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारा समोर आणण्यात आला होता.
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
यावेळी उरणचे माजी आमदार मनोहर भोईर,कामगार नेते भूषण पाटील,बोकडविरा ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, कामगार नेते महादेव घरत,भेंडखळ च्या माजी सरपंच संध्या ठाकूर,डोंगरीचे किरण घरत आदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या चर्चेत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी ही चर्चा केले जाणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर भोईर यांनी यावेळी दिली. त्यानंतर सोमवारी रात्री आपले ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेत मृत कामगारावर अंत्यसंस्कार केले.
तिसरा कामगार ही चिंताजनक
या दुर्घटनेतील तिसरा कामगार कुंदन पाटील यांची परिस्थिती ही चिंताजनक असून त्यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.