एपीएमसी भाजीपाला बाजारात सध्या कच्चा कैऱ्यांची आवक वाढली असून लोणची व पन्हे याकरीता ग्राहकांची मागणी देखील वाढत आहे. शुक्रवारी बाजारात ५९०क्विंटल आवक झाली आहे. भाजीपाला बाजारात उन्हाळा सुरू होताच कच्या कैऱ्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. एप्रिल-मे महिन्यात दाखल होतात. एप्रिल मध्ये ४-५ गाड्या कमी प्रमाणात आवक होते. मात्र मेमध्ये आवक वाढण्यास सुरुवात होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : लाच स्वीकारताच एसीबीने केली कारवाई, मात्र निघाले आरटीओ एजंट
सध्या बाजारात ८ गाड्या दाखल झाल्या असून असून निलम, तोतापुरी जातीच्या कैरीचा समावेश आहे. घाऊकमध्ये प्रतिकिलो २४-४०रुपये दर आहेत. तर किरकोळ बाजारात ६० ते ८०रुपयांनी विकिली जात आहे. महाराष्ट्र सहदक्षिण भारत, गुजरात मधून याची आवक होत असते. या बाजारात दाखल होणाऱ्या कैऱ्या चवीला आंबट असून लोणचे आणि पन्हे बनविण्यासाठी अधिक मागणी होत आहे. पूढील कलावधीत आणखीन आवक वाढेल असे मत घाऊक व्यापारी यांनी व्यक्त केले आहे.