लोकसत्ता टीम

उरण: महिलांच्या हक्काच्या दिनाचे निमित्त साधत रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेच्या वतीने बुधवारी उरणच्या गांधी चौकात गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. गॅस दरवाढ मागे घ्या, महागाई कमी करा, बेरोजगारांना काम द्या, सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, भूमिहीनाना रेशनवर मोफत धान्य द्या, आशा वर्कर ना मानधन आणि सुविधा द्या आदी मागण्याच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. निदर्शनात जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर, जेष्ठ महिला कार्यकर्त्या कुसुम ठाकूर, चंपा पाटील, आशा वर्कर संघटनेच्या रसिका घरत व किसान सभेचे सचिव संजय ठाकूर यांची भाषणे झाली.

Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

आणखी वाचा- चार वर्षीय आदिवासी मुलाला सर्प दंश, वेळेत उपचार झाल्याने मुलाचे प्राण वाचले

८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन ठरविण्यामागे एक मोठा इतिहास आहे. १८५७ यावर्षी न्यूयॉर्कमध्ये शिलाई कामगार स्त्रियांचा भीषण पिळवणुकी विरुद्ध मोठा संप होऊन निदर्शने झाली. त्यांच्यावर दडपशाही ही जबर झाली. तोच हा ८ मार्च जेव्हा युरोप मधील स्टुट गार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद १९०७ रोजी भरली होती आणि जर्मन कम्युनिस्ट पक्षाची थोर पुढारी क्लारा झेटकीन हिने स्त्रियांच्या हक्का विषयांचा प्रश्न पुढे आणला.

आणखी वाचा- Video : लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, काळ्या फिती लावत आंदोलनद्वारे महिलांनी केला मध्य रेल्वेचा निषेध

स्त्रियांचे हक्क, माता व बालकांचे हक्क आणि मतदानाचा पुरुषांप्रमाणे समान हक्क यासाठी कामगार वर्गाने पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यावेळी गिरणी कारखान्यात कामाचे तास १२ ते १४ असे असत. पगार व कामाचे तास यासाठी कायदे नसत, म्हणून त्यांनी ट्रेड युनियन संघटना बांधून ८ तासांचा दिवस, किमान पगाराची हमी अशाही मागण्या केल्या. जगातील सर्व स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी व लढ्यासाठी एक दिन ठरवावा म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनानेने १९७५ ला या जागतिक दिनाची घोषणा केली. तेव्हा पासून महिलांच्या हक्काचा दिवस पाळला जात आहे.

Story img Loader