विशेष महासभा रात्री १२ वाजेपर्यंत मलेरिया व डेंग्यूच्या आजाराने गाजल्यांनतरही शहरातील स्वच्छता आणि आरोग्याचा प्रष्टद्धr(२२४)्ना ‘जैसे थे’च आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले. डेंग्यू, मलेरिया निर्मूलनासाठी पालिका कधी उपाययोजना करणार असा प्रष्टद्धr(२२४)्ना उपस्थित करत सदस्यांनी या प्रश्नाकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र ऐरोली, सीबीडी, बेलापूर, नेरुळ या ठिकाणी उभारण्यात आलेले रुग्णालय बंद असल्याने त्यांचा फटका नाहक नागरिकांना बसत आहे. डेंग्यूचा आजार नियंत्रणासाठी मागील महिन्यात विशेष महासभेत प्रदीर्घ चर्चादेखील करण्यात आली. परंतु त्यांनतरही डेंग्यूने थमान घातले आहे. एम.के.मढवी, रवींद्र इथापे, रुपाली भगत, शंकर मोरे या सदस्यांनी या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असेल व अस्वच्छतेने थमान घातले असेल तर स्मार्ट सिटी म्हणून शहरांची लौकिकता का वाढवायची असा प्रष्टद्धr(२२४)्ना मढवी यांनी उपस्थित केला. अनेक अधिकांऱ्याकडे असणारे अतिरिक्त कारभार त्यामुळेदेखील प्रशासकीय कामाबाबत दिरंगाई होत असल्याची बाब सदस्यांनी स्थायी समितीसमोर निदर्शनास आणली. वैद्यकीय अधिकांऱ्याकडे पालिका रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मलेरिया व डेंग्यूविषयी योग्य ती उपचार पद्धती मिळत नसल्याने पर्याय म्हणून रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात. अनेकदा चर्चा होऊनही हा प्रश्न न सुटल्याने वैद्यकीय अधिकांऱ्याना याबाबत जाब विचारण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनी शहरातील आजार नियंत्रणाकरिता पालिका रुग्णालय तसेच विशेष मोहीम लवकरच कार्यान्वित करणार असल्याची माहिती दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue discussion in meeting