नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळापूर्व छाटणी करण्यात येते. यंदा धोकादायक वृक्ष सर्वेक्षणालाच जून महिना उजाडला असून शहरात यंदा १७३ धोकादायक झाडांपैकी आतापर्यंत अवघी २३ झाडे तोडण्यात आलेली आहेत. आद्यप धोकादायक झाडे पूर्णपणे तोडली नसल्याने पावसाळ्यात यांचीच पडझड होत आहे का? यानिमित्ताने असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

पावसाळा सुरू झाला की शहारत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नित्याच्याच असतात. त्यासाठी महापालिका धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन पावसाळा पूर्वीच छाटणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यातच धोकादायक वृक्ष सर्वेक्षण पूर्ण होऊन मे अखेरपर्यंत छाटणी ही पूर्ण केली जाते. मात्र यंदा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात झाडांची तोडणी करू नये अशी मागणी केली होती, त्यामुळे महापालिकेने धोकादायक वृक्ष सर्वेक्षण आणि छाटणीला उशिराने सुरुवात केली अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही वाचा >>>पनवेल : ‘तो’ सूतळी बॉम्ब इमारतीमधील ६८ वर्षीय रहिवाशाने ठेवला

धोकादायक वृक्ष सर्वेक्षणाला उशीर झाला असून सर्वेक्षण पूर्ण झाले असून शहारत एकूण १७३ झाडे धोकादायक परिस्थितीत आढळून आली आहेत. तेच मागील वर्षी १४३ धोकादायक झाडे होती. यामध्ये सर्वाधिक धोकादायक झाडे ही बेलापूर मध्ये आहेत , बेलापूर मध्ये ६५ धोकादायक झाडे असून त्यापैकी १४ झाडे तोडली आहेत. त्यांनतर नेरुळ ,वाशी, घणसोलीचा नंबर लागतो. नेरुळ मध्ये ३२पैकी ६, वाशीत २६ आणि घणसोलीमध्ये २१ पैकी एका ही झाडाची छाटणी झालेली नाही. आतापर्यंत केवळ २३ झाडे तोडण्यात आली असून उर्वरित लवकरच तोडण्यात येतील अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली आहे.