नवी मुंबई : एकीकडे अटल सेतूमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाशी खाडी पुलावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला होता, परंतु टोलमुक्तीनंतरही वाहनचालकांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढती वाहने, उड्डाणपुलांची कामे आणि उड्डाणपुलांच्या तोंडाशी लेनचा होणारा संकोच या कारणांमुळे वाशी टोल नाक्यावर टोलमुक्ती नंतरही कोंडीकायम असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑक्टोंबर महिन्यात सुरू झालेल्या वाशी खाडी पुलावरील तिसऱ्या उड्डाणपुलावरील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरु झाला आहे. परंतु वाढत्या वाहनांमुळे तसेच दोन्ही दिशांकडील उड्डाणपुलाच्या कामांमुळे आणि वाशीवरून ११ लेनची वाहने मुंबईच्या दिशेला जाताना उड्डाणपुलाच्या तोंडाशी फक्त ३ लेनमधून जात असल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा… नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई वाशी खाडी पुलावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन १३ ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. वाशी खाडी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन नवे खाडी पूल तयार करण्याच्या नियोजनानुसार एका खाडी पुलाचा वापर सुरु झाला आहे. वाशी खाडी पुलावर सुरु असलेल्या प्रत्येकी ३ लेनच्या दोन पुलापैकी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा पुल सुरु झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु त्यानंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेवर संबंधित एल अँड टी कंपनीचा आरएमसी प्लांटच्या ठिकाणी काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱी वाहतूक मानखुर्द पासून ५ लेनवरून येऊन पुढे उड्डाणपुलाच्या सुरुवातीला ती वाहतूक जुन्या पुलावरच फक्त २ लेनमध्ये जात असल्याने उड्डाणपुलाच्या पूर्वीच प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे ही वाहतूककोंडी अगदी मानखुर्द सिग्नलपर्यंत असते.

मानखुर्द सिग्नलच्या येथेही रस्त्याच्या कडेला पुण्याकडे जाणाऱ्या बस गाड्यांची गर्दी असते. त्यामुळे मानखुर्द ते वाशी उड्डाणपुलापर्यंत ५ मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना ४० ते ४५ मिनिटापर्यंतचा कालावधी लागतो. वाहतूक पोलिसांचीही ही कोंडी सोडविताना दमछाक होते.

हे ही वाचा… PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

उड्डाण पुलावर होणारे अपघात यांची वाहतूक कोंडी होण्यासाठी मोठी भर पडते. टोलमुक्तीमुळे अटल सेतूवरून जाणारी वाहने पुन्हा वाशी टोल नाक्यावरून जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे.- दिलीप गुजर, वाहतूक पोलीस, वाशी टोलनाका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite toll exemption traffic congestion on both entryways at vashi toll plaza asj