मुंबईतील काही गुंतवणूकदारांना पाच लाख रुपयांत पनवेलमध्ये घर देण्याच्या आमिषाने मुंबईतील काही गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या विकासकाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली. संतोष अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे. ‘रियल इंडिया होम्स’ या नावाने संतोष याने आपली विकासक कंपनी सुरू केली. उपनगरीय लोकलगाडय़ांमधून तसेच वृत्तपत्रांमधून त्याने कंपनीची जाहिरात केली.
यातील काहींनी त्याच्याकडे घरासाठीची काही रक्कम जमा केली. अग्रवाल याच्या कंपनीच्या वतीने नेरे परिसरात वाकडी गावाजवळ इमारतींचे बांधकाम सुरू असल्याचे गुंतवणुकदारांना दाखवण्यात आले. यातूनच त्याने अनेक जणांकडून आगाऊ रक्कम घेतली. १२० घरांच्या बांधकामास परवानगी असताना ‘रियल इंडिया होम्स’च्या प्रकल्पात अग्रवाल याने ८५२ जणांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये घेतल्याचे खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश थोरात यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा