उरण : सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असून मंगळवार पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. त्यातच गणेशमूर्ती ही घरी नेण्यासाठी भक्त बाजारात आले आहेत. याच गर्दीत दुचाकीवरून गणेशमूर्ती नेणाऱ्या भक्तांनाही शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसू लागला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत सफाईमित्रांनी जल्लोषात फोडली स्वच्छतेची इकोफ्रेंडली दहीहंडी

उत्सवात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याची जबाबदारी उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाची असतानाही ती दिसत नसल्याने कोंडीत अधिकची भर पडली आहे. उरण शहरातील रस्ते हे अरुंद आहेत. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर परिघाच्या कक्षेत वसलेल्या या शहरात वाहनतळाचा अभाव आहे. त्याचप्रमाणे दिवसागणिक वाढणारे फेरीवाले आणि वाढती वाहनांची संख्या यांचीही भर पडत आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बेशिस्त वाहन पार्किंग या वाहनांवर न होणारी कारवाई या सर्व समस्यांमुळे कोंडीत अधिकची वाढ झाली आहे. त्यामुळे उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवून किमान उत्सवाच्या काळात तरी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Story img Loader