नवी मुंबई शहरात दिनांक १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान नवी मुंबईतील सर्वच शिवमंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी सकाळापासूनच भक्तांची रिघ लागली होती.
हेही वाचा- नवी मुंबईतील इ-टॉयलेट संकल्पना अयशस्वी, पारंपरिक शौचालय बांधण्याचा निर्णय
महाशिवरात्रनिमित्त भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते .नवी मुंबईत पावणेगावतील पावनेश्वर मंदिर, वाशीतील जागृतेश्वर मंदिर,कोपरखैर णे चिकनेश्वर मंदिर, सानपाडा,घणसोली,सारसोले गाव बामनदेव मंदिर,, सेक्टर १४ वाशी एमजीएम कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. महाशिवरात्री निमित्त उपवास असल्याने सर्वच मंदिरात विश्वस्तांकडून व काही मित्र मंडळाकडून भक्तांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.