नवी मुंबई : डान्सिंग अंपायर , स्थानिक बोली भाषेत समालोचन आणि लाखो रुपयांची बक्षिसाची बरसात असा अनुभव गेले २१ वर्ष नवी मुंबईकर घेत असतात ते “धर्मवीर” क्रिकेट चषकच्या निमित्ताने. यंदा हे बाविसावे वर्ष असून यावेळीही खास डान्सिंग अंपायर थेट पंढरपूरहून मागवण्यात आला आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते संजय राउत आणि माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस वितरण नंतर शिवसेनेच्या सात शाखांचे उद्धाटन केले जाणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबईत गेल्या २१ वर्षापासून शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे हे धर्मवीर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरखैरणे येथे करतात. ठाणे शिवसेना अध्यक्ष आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ २००१ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षात मिळणारा प्रतिसाद पाहता आता नवी मुंबई आणि नवीमुंबई बाहेरील अशा दोन गटात हे सामने होत असून प्रत्येकी आठ संघांचा समावेश या वर्षी आहे. गेल्या अनेक वर्षापासून येमन येथे स्थाईक झालेले निलेश झुंजारराव हे खास या सामन्यात सामील होण्यासाठी भारतात अनेक वर्षापासून येतात. तसेच विविध देशात कामानिमित्त स्थाईक झालेले ७ पेक्षा अधिक खेळाडू यंदा सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: उरण: रखडलेले करंजा मच्छीमार बंदर नव्या वर्षात कार्यान्वित होणार; मेरिटाईम बोर्डाकडून पुन्हा नवा मुहूर्त

या सामन्यांचे अनेक खास वैशिष्टे असून त्यात नृत्य करत निर्णय देणारे अंपायर हे एक विशेष असून गोट्या नावाच्या अंपायरच्या स्टाईलचे कौतुक आपल्या ब्लॉग मधून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केले आहे. महिलांना समालोचन करण्याची संधी जगात प्रथम याच सामन्यात देण्यात आल्याचा दावा आयोजन म्हात्रे यांनी केला आहे. समालोचन अत्यंत मनोरंजक आणि स्थानिक बोलीभाषा आगरी कोळी मध्ये असल्याने खास ते ऐकण्यासाठी लांबून लोक येतात असेही प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले.यंदा या सामन्यांचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते संजय राउत यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित असणार आहेत. कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानात हे सामने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान होणार असून प्रथम पारितोषिक चषक आणि २ लाख २ हजार रुपये आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये असणार आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : सानपाडा उड्डाणपुलाखाली लोखंडी जाळी बसवूनही अस्वच्छता कायम

बक्षीस वितरण निमित्त खासदार संजय राउत येणार असून त्यांच्या हस्ते नवी मुंबईतील घणसोली आणि कोपरखैरणे भागात ७ शिवसेना शाखांचे उद्धाटन करण्यात येणार आहे. नवी मुंबईत शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने हे पाउल असल्याचे याच पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबई अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सांगितले.