होळी व धुलीवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात रंग पिचकारीने बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमी निमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग ,लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांची खरेदी सुरू झाली  आहे. येथील  बाजारपेठत नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक स्वतःत घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात भारतीय बनावटी साहित्य उपलब्ध असून मागील वर्षी पेक्षा यंदा दर १५%-२०%कमी असल्याचे मत व्यापारी यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक रंगाला अधिक मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक  रंग २० रु ते २५० रु तर ओले रंग १५०-२०० रुपयांवर उपलब्ध आहेत. तसेच यंदा बाजारात कलर ब्लास्टर , सिलेंडर स्प्रे रंग ही उपलब्ध असून ९००, १२५० ते १७००रुपयांनी उपलब्ध आहे.

हेही वाचा >>> खारकोपर ते नेरुळ-बेलापूर लोकल अकरा तासांनी पूर्ववत; ७-४२ वाजताची ची नेरुळ ते खारकोपर लोकल सुटली

लहानग्यांची कार्टून पिचकारीला अधिक मागणी

बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्याची क्रेज लहान मुलांमध्ये असते.   पबजी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची अधिक क्रेज पहावयास मिळत आहेत. यंदा आवाज येणार पिचकारी २५०रुपयांनी उपलब्ध आहे.  विविध डिझाईनच्या पिचकारी ४० रु ते ६५० रुपयांवर तर पबजी पिचकारी २५० रु ते ५००रुपयांवर उपलब्ध आहेत.

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांनची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत.त्याचबरोबर लहान मुलांमध्ये कार्टून पिचकारीची मागणी करीत असतात.

गोविंद सिंग, विक्रेता, वाशी बाजार

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of natural colours pichkari in wholesale market for sale zws