जात पंचायत निर्णयाने ज्या प्रमाणे एखाद्या कुटुंब,व्यक्तीला वाळीत टाकले जाते ,अगदी त्याच प्रमाणे नवी मुंबई महानगर पालिकेने कोपरी गाव स्मशाभूमीला वाळीत टाकल्याचा आरोप होत आहे. कारण मागील पाच ते सहा वर्षापासून या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीची मागणी करून देखील महापालिकेने याकडे पाठ फिरवल्याने स्मशानभूमीची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशार दिला आहे.

हेही वाचा- “शिवसेनेचे तुकडे झाले तसे भाजपाचेसुद्धा होऊ द्या, त्यात आमचाच फायदा”; खासदार इम्तियाज जलील यांची टीका

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

कोपरी गावात पुरातन अशी स्मशानभूमी आहे. कालांतराने महापालिकेने १९९८-९९ साली तिची सुधारणा केली. सन २०१५ ला लोकप्रतिनधींच्या मागणीनुसार कोपरी गावासाठी उड्डाणपूल शेजारी स्मशाभूमी मंजूर करून ती बांधण्यात आली. मात्र उड्डाणपूल शेजारी स्मशानभूीची मागणी ही ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ आजही गावातील जुन्या स्मशानभूमीसाठी आग्रही असून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार पार पाडले जात आहे. गावातील जुनी स्मशाभूमी हटवण्यास विरोध केला असून तसा ठराव ग्रामस्थ मंडळाने २०१८ साली एक मताने मंजूर केला आहे. तेव्हा पासून जुन्या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीची मागणी करत आले आहेत. मात्र या मागणी कडे महापालिका प्रशासनाने पुरती पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील देखभाल दुरुस्ती ग्रामस्थ स्वतः करीत आले आहेत. बर्निंग स्टँड,पत्रा शेड, फरशी अशी कामे केली आहेत. मात्र आता ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून वाळीत टाकलेल्या कोपरी स्मशानूमीची देखभाल दुरुस्ती ,अगर नवीन स्मशान भूमी न बांधल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशार दिला आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना छोटा रिचार्ज भेटून गेला”; ठाकरे- केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

कोपरी गावातील स्मशानभूमी न हटवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जुलै २०१८ रोजी एक मताने मंजूर केला आहे असे असून देखील महापालिका या स्मशानभूमीची सुधारणा करीत नाही. त्यामुळे येत्या एक महिन्यात स्मशनभूमीच्या सुधारणा किंवा नवीन बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला नाही तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती कोपरी गावाचे समाजसेवक केशव ठाकूर यांनी दिली.

Story img Loader