नवी मुंबई: देशात फक्त एकाच नावाची चर्चा असून ते नाव म्हणजे शरद  पवार आहे. मात्र नवी मुंबई मनपा मध्ये अजून एका शरद पवार यांची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात याला कारण त्यांचे नावाचं ठरले आहे. वाचा नेमके हे शरद पवार कोण ? 

नवी मुंबई महानगरपालिकेत शरद पवार उपायुक्त म्हणून रुजू अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरु आहे. हे शरद पवार प्रतिनियुक्तीवर नवी मुंबई महानगर पालिकेत उपायुक्त प्रशासन  पदी विराजमान झाले आहे. यापूर्वी नितीन नार्वेकर यांच्या कडे प्रशासन जवाबदारी होती. मात्र त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शरद पवार आले असून आजच त्यांनी कामकाजाला सुरवात केली आहे.

हेही वाचा…. नवी मुंबई: दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार 

पवार यांनी या पूर्वी  निवासी उपजिल्हाधिकारी अर्थात प्रांत म्हणून काम पहिले असून वेंगुर्ले येथे ते होते. त्यांना शासनाने प्रतिनियुक्तीवर नवी मुंबई मनपात पाठवलेले आहे. त्यांच्या नावामुळे आज मनपा वर्तुळात त्यांच्याच नावाची चर्चा होती. नितीन नार्वेकर यांची नियुक्ती सह संचालक म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ येथे करण्यात आली आहे.  

Story img Loader