नवी मुंबई : वाशी सेक्टर १५ येथे चित्रकलेच्या शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून एका युवकाने प्रायव्हेट पार्ट(गुप्तांग) दाखवले. अचानक घडलेल्या या प्रकाराची पालकांनी दखल घेत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .कोपरखैरणे येथे राहणारी ही अल्पवयीन मुलगी वाशी सेक्टर १५ येथे चित्रकलेच्या खाजगी शिकवणीला एकटीच जात असते. १७ तारखेला ती नेहमी प्रमाणे संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान शिकवणीला जात असताना सेक्टर१५ येथील मराठा भवन नजीक दुचाकीवर आलेल्या एका युवकाने तिला थांबवले, आणि सेक्टर१८ कुठे आहे अशी विचारणा केली. तसेच तिला गाडीवर बसण्याचा आग्रह केला आणि पत्ता शोधण्यास मदतीची विनंती केली.

हेही वाचा : उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

युवतीने नकार तेथून काढता पाय घेतला . काही अंतरावर पुन्हा युवकाने तिला थांबवले व दुचाकीवरच जमिनीला पाय टेकवून उभा राहिला. काही कळायच्या आत त्याने पॅन्टची चेन काढत प्रायव्हेट पार्ट मुलीस दाखवला. हा किळसवाणा प्रकार पाहून ती मुलगी शिकवणीला धावतच गेली व घडला प्रकार सरांना सांगितला. त्यांनी मुलीच्या आईला फोन करून बोलावून घेतले व सर्व प्रकार कथन केला. या प्रकरणी गप्प न बसता आईने मुलीस घेऊन थेट वाशी पोलीस ठाणे गाठले व त्या दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बाल लैंगिक अत्याचार कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader