उरण : जेएनपीए बंदर विस्थापित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून अचानकपणे समुद्रात मासेमारी बोटी घेऊन जात बंदरात ये जा करणारी जहाजे अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ माजली असून जेएनपीए प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांबरोबर बैठक सुरू केली आहे.

हेही वाचा – उरण : द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त

हेही वाचा – पनवेल : सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची एक लाख ४७ हजारांची फसवणूक

मागील अनेक वर्षांपासून वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसनासाठी आंदोलन, बैठका आणि चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Story img Loader