नवी मुंबई :  नवी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटात शाखा कार्यालय हक्क वाद अद्याप थांबलेला नाही. आज(गुरुवारी) तुर्भे येतील सेना कार्यालयास  उद्धव ठाकरे गटाने लावलेले टाळे व फलक पोलिसांच्या उपस्थितीत शिंदे गटाने  काढले. हा अन्याय असून न्यायालयायीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पोलिसांच्या मदतीने शिंदे गटाने दादागिरी करीत शाखेचा ताबा घेतल्याचा दावा पत्रकार परिषदेत ठाकरे गटाने केला. तर या पत्रकार परिषदे नंतर तात्काळ शिंदे गटाचे सुरेश कुलकर्णी यांनीही आपली बाजू मांडली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : दिवाळी संपताच बेकायदा फलकबाजीवर कारवाईचा चाबूक

नवी मुंबईत शिवसेना शाखेचा वाद शिगेला पोहोचलाय शिवसेना शिंदे गटातर्फे तुर्भे मधील शाखा ताब्यात घेण्यात आली. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटातर्फे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून पोलिसांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी टाळा तोडत शाखा ताब्यात घेतल्या असून याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तर शिंदे गटाने देखील प्रतिउत्तर देत ही शाखा आम्हीच बांधली असून शाखा आमचीच असल्याचे ठणकावलेय. सदर शाखेचे कागदपत्रे आमच्या गटातील व्यक्तीच्या नावे आहेत या शिवाय विद्युत देयक देखभाल दुरुस्ती आदी खर्च आम्हीच करत असताना ठाकरे गटाने आपला हक्क सांगावा हे दुर्दैवी असल्याचे उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

Story img Loader