लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : विधानसभेच्या निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी संपली आणि उरणच्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मतविभाजन होऊन विद्यामान आ. महेश बालदी या भाजप उमेदवाराला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपला जे हवे होते, तसेच घडल्याने भाजप कार्यकत्र्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

arvi assembly constituency bjp dadarao yadavrao keche withdraws from the maharashtra assembly election 2024
Arvi Assembly Constituency : आर्वीत अखेर केचेंची माघार, म्हणतात माझा पक्षाला लाभच होणार
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
आज माघारवार! अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
BJP Rajesh Khatgavkar vs Congress Minal Patil Naigaon Assembly Constituency
Naigaon Assembly Constituency : जुन्या भागीदारांचे राजकीय वारस आमने-सामने !
Mahavikas Aghadi campaign, Sharad Pawar,
‘मविआ’च्या प्रचाराला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठ्या नेत्याने दिली माहिती!
Amravati, Election work, employees, cancellation of duty, Amravati Election work,
अमरावती : कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीचे काम नावडते! ड्युटी रद्द करण्‍यासाठी ८२० अर्ज
vidhan sabha election 2024 in Akola, Washim district rebel challenge
बंडोबांचा थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान; अकोला, वाशीम जिल्ह्यात ‘उदंड जाहले बंड’;…तर राजकीय समीकरणाला ‘फटाके’

या मतदारसंघातील मतदारांना महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित होती. कारण लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला मताधिक्य दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील मतभेदांमुळे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी वॉर रूम सज्ज झाल्या आहेत. यातून समाजमाध्यमाद्वारे प्रचार सुरू झाला आहे. तर उरणमध्ये महाविकास आघाडीतील रस्सीखेचीमुळे ही निवडणूक तिरंगी झाली आहे.

आणखी वाचा-निवडणुकीनंतर विमानतळ नामकरण आंदोलन तीव्र, नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची माहिती

सध्या उरण विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष या तीन प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. या वॉर रूममधून इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. काहींनी तर मतदान केंद्रनिहाय आपली तयारीही पूर्ण केली आहे. त्यासाठी कार्यकत्र्यांनी कंबर कसली आहे. उरण विधानसभा निवडणुकीत विद्यामान आ. महेश बालदी हे भाजपकडून, माजी आ. मनोहर भोईर शिवसेना ठाकरे गटाकडून तर प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून प्रचाराला सुरुवात केली आहे.

मतांचे विभाजन

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात एकमत न झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची मते विभागली जाणार आहेत. याचा फायदा महायुतीचे उमेदवार असलेल्या भाजपला होणार आहे.