उरण तालुक्यातील पाले येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. येथील इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांनी मिळून पुनाडे मधील आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना आपल्या घरात बनविलेले फराळ व कंदील, फटाके, तोरण यासारखे दिवाळीच्या साहित्याचे वाटप केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाच- बोनससाठी कोकण रेल्वे कामगार आग्रही; सीबीडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

आदिवासी हे पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर जगण्यासाठी(मोलमजुरीला) आपलं मूळ राहत पाडा ठिकाण सोडून दुसऱ्या गावात किंवा शहरात जातात. मात्र त्यांची मुलं मूळ गावीच असतात. त्यामुळे एकीकडे पाड्या शेजारील गावात दिवाळीचा झगमगाट,आणि गोड धोडाची मेजवानी होत असताना आदिवासी मात्र या सर्वांपासून दूर असतात. त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा याकरीता पाले शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: ३० वर्षांपासून रखडलेला नाल्यावरील पुल अखेर मार्गी लागणार

पाले येथील शिक्षकांनी विद्याfर्थ्यांना पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या निमित्ताने दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी घरी तयार केलेला दिवाळीचा फराळ हा नजीकच्या आदिवासी वाडीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पुनाडे येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन दिवाळी फराळ, वह्यासह शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distributed home made snacks and diwali materials to the students of the tribal village in punade by zilla parishad school students navi mumbai dpj
Show comments