पनवेल : केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाच्या जवानांकडून खारघरमध्ये एका डॉक्टरसह त्यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण झाली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता खारघरमध्ये सेक्टर १२ येथील रस्त्यावर घडली. पोलीसांनी १० ते १५ केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाच्या जवानांविरोधात मारहाणी केल्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात नोंदविला आहे.
 
मुंबई येथील विमानतळावर सूरक्षेसाठी तैनात असणा-या केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान राहण्यासाठी खारघर वसाहतीमध्ये आहेत. शुक्रवारी रात्री जवानांच्या चार बसगाड्या भरुन रात्री सव्वा दहा वाजता खारघरमधील प्रणाम रस्त्यावरुन जात असताना सीआयएसएफ जवानांच्या एका बसगाडीला डॉ. श्रीनाथ प्रकाश परब यांच्या वाहनांनी दाबले. मात्र जवानांची बसगाडी का दाबली याचा जाब विचारण्यासाठी डॉ. श्रीनाथ यांचे वाहन थांबविण्यात आले. त्यावेळी डॉ. श्रीनाथ यांच्यासोबत वहिणी शर्वरी परब आणि मित्र जयेश विसावे हे प्रवास करत होते. दोनशे जवान असलेल्या चारही बसगाड्या थांबल्यामुळे किमान दोनशे जवान रस्त्यावर उतरले. मात्र त्यापैकी १५ जवानांनी डॉ. श्रीनाथ यांच्यासह सर्वांनाच मारहाण व शिविगाळ केली. डॉ. श्रीनाथ यांच्या वाहनाची काच सुद्धा फोडल्याचे तक्रारीत डॉ. श्रीनाथ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…उरण : सिडकोच्या सागरी महामार्गावर खड्डे, जड वाहतुकीमुळे खोपटे पूल चौकात अपघाताची शक्यता

MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Eknath Shinde Help to Vinod Kambli
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

१० ते १५ जवान प्रशुब्ध झाल्याने काही जवान त्यांना शांत करत होते. या सर्व घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर जवानांच्या कृत्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी १५ अनोळखी सीआयएसएफ जवानांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनूसार रितसर शनिवारी पहाटे पावणेपाच वाजता गुन्हा दाखल केला. या मारहाणीत डॉ. श्रीनाथ यांच्या वहिणीला सुद्धा मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. श्रीनाथ यांचे बंधू प्रसाद हे खारघरचे शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. या घटनेनंतर शनिवारी सकाळी सीआयएसएफच्या काही वरिष्ठ अधिका-यांनी उलट शिविगाळची लेखी तक्रार परब यांच्याविरोधात दिल्याने पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा परब यांच्याविरोधात नोंदविला आहे. खारघरच्या या घटनेनंतर १५ जवान असे प्रशुब्ध का वागले. मारहाण करणारे जवान नेमके कोण होते. यांच्यावर कामाचा काही ताण होता का अशी अनेक प्रश्न शहरात चर्चेला येत आहेत.

Story img Loader