पनवेल : केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाच्या जवानांकडून खारघरमध्ये एका डॉक्टरसह त्यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण झाली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता खारघरमध्ये सेक्टर १२ येथील रस्त्यावर घडली. पोलीसांनी १० ते १५ केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाच्या जवानांविरोधात मारहाणी केल्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात नोंदविला आहे.
मुंबई येथील विमानतळावर सूरक्षेसाठी तैनात असणा-या केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान राहण्यासाठी खारघर वसाहतीमध्ये आहेत. शुक्रवारी रात्री जवानांच्या चार बसगाड्या भरुन रात्री सव्वा दहा वाजता खारघरमधील प्रणाम रस्त्यावरुन जात असताना सीआयएसएफ जवानांच्या एका बसगाडीला डॉ. श्रीनाथ प्रकाश परब यांच्या वाहनांनी दाबले. मात्र जवानांची बसगाडी का दाबली याचा जाब विचारण्यासाठी डॉ. श्रीनाथ यांचे वाहन थांबविण्यात आले. त्यावेळी डॉ. श्रीनाथ यांच्यासोबत वहिणी शर्वरी परब आणि मित्र जयेश विसावे हे प्रवास करत होते. दोनशे जवान असलेल्या चारही बसगाड्या थांबल्यामुळे किमान दोनशे जवान रस्त्यावर उतरले. मात्र त्यापैकी १५ जवानांनी डॉ. श्रीनाथ यांच्यासह सर्वांनाच मारहाण व शिविगाळ केली. डॉ. श्रीनाथ यांच्या वाहनाची काच सुद्धा फोडल्याचे तक्रारीत डॉ. श्रीनाथ यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा