देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हे विचार आचरणात आणल्यास देशाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही असे उद्गार डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांनी श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टीब्रेवाला विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्या दरम्यान काढले,
श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टिब्रेवाला विद्यापीठाने श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा वाशी येथील प्रदर्शन केंद्रात रविवारी एका विशेष दिमाखदार कार्यक्रमात डॉक्टरेट ही पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री श्रीयुत आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी ,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा ,खासदार डॉक्टर पूनम महाजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनोद टीब्रेवाला, तसेच विद्यापीठाचे संचालक मंडळ, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटूंबीय तसेच लाखो श्री सदस्य उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा