नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये राजा नावाच्या श्वानाने कमाल केली आहे. या कुत्र्यांने चोरी करून धावणाऱ्या चोरट्याला पकडून दिलं आहे. संबंधित चोरट्याने मध्यरात्री भाजी मार्केटमधील शौचालयातून फळ मार्केटमध्ये प्रवेश केला होता. संबंधित चोरट्यासोबत अन्य दोन साथीदार होते. तिघांनी फळ मार्केटमध्ये प्रवेश करून एका व्यापाऱ्याचे ३० हजार रोख रक्कम आणि मोबाईल फोन लंपास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित तिन्ही चोरटे ऐवज घेऊन पळ काढताना फळ मार्केटमधील राजा नावाच्या श्वानाने एका चोरट्याला पकडून सुरक्षारक्षकाच्या हवाली केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा श्वान रस्त्यावरील असून तो सध्या एपीएमसी फळ बाजारात सुरक्षा रक्षकांचीच भूमिका बजावत आहे. मोकाट श्वानाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तर एक श्वान सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावत असताना बाजारपेठेतील सुरक्षारक्षक काय आहेत? असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog helps to catch thief who robbed 30 thousands from businessman rmm