लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
CAG report on expenditure incurred by Arvind Kejriwal on CM residence
नूतनीकरणाची किंमत ३३ कोटी! केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थानावर केलेल्या खर्चासंबंधी ‘कॅग’चा अहवाल
Kalyan house theft, pest control Kalyan, Kalyan theft,
कल्याणमध्ये घरात पेस्ट कंट्रोलसाठी आलेल्या कामगाराने केली चोरी

गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आदी कागदपत्र आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

हेही वाचा… पावसाने दडी मारल्याने सीताफळाची वाढ खुंटली, एपीएमसीत दाखल होतायेत लहानगे सीताफळ; दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतिक्षा

गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२, १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध असून त्यावर संपर्क करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Story img Loader