उरण : एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे उरण-पनवेल तालुके हे बालेकिल्ले म्हणून गणले जात होते. माजी खासदार दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील, विवेक पाटील, दत्ता पाटील व मीनाक्षी पाटील यांनी या तालुक्यात विजय संपादित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील पंधरा वर्षांत या दोन्ही तालुक्यांतील शेकापची ताकद काही प्रमाणात क्षीण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र तरीही या दोन्ही तालुक्यांतील गावोगावच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपलं स्थान राखून ठेवलं आहे व आपल्या जुन्या ताकदीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही तालुक्यांतील पक्ष कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

हे ही वाचा… Maharashtra News Live Updates : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; राज्यातील इतर बातम्या वाचा एका क्लिकवर…

या दोन्ही तालुक्यांत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला तरी शेकापच्या ताकदीत वाढ झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. अनेक वर्षे उरण तालुका हा पनवेल आणि अलिबाग या दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला होता. त्यामुळे यातील बहुतांशी निवडणुका या शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या आहेत. मात्र पनवेलमध्ये शेकापमधून रामशेठ ठाकूर बाहेर पडून प्रथम काँग्रेस तर सध्या भाजपाच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

हे ही वाचा… साडेतीन वर्षाच्या बालकावर कर्णरोपणाची मोफत शस्त्रक्रीया; दोन वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांनी केली आर्थिक

२००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत उरण विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र झाला आहे. यात पहिली निवडणूक महायुती म्हणून शेकापने जिंकली होती. तर २०१४ ला स्वतंत्र निवडणूक लढवीत शिवसेनेने जिंकली होती. २०१९ मध्ये भाजपच्या साह्याने अपक्षाने जिंकली. या निवडणुकीत शेकाप २००९ च्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तर २०१९ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मात्र तरीही या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला ६० हजार मते मिळाली होती. याच कालावधीत उरण विधानसभेचे माजी आमदार विवेक पाटील हे तुरुंगात होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे शेकापची ताकद घटली आहे. याही परिस्थितीत निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते पक्षात टिकाव धरून आहेत. याच पार्श्वभूमीवर विवेक पाटील तुरुंगातून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे. याचा परिणाम या कार्यक्रमाला कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Downfall of farmers and peasants party in last fifteen years asj